चर्चेला आता आलेले स्वरूप पाहता मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
अध्यात्मामध्ये प्रगत अशा अनेक सत्पुरुषांच्या चरित्रांमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या लिखाणामध्ये बऱ्याच अद्भूत गोष्टींचे दाखले मिळतात. सर्वविद्वतजनमान्य अशा आणि जे स्वतः अतिशय पुरोगामी विचारांचे विचारवंत होते अशा लोकांच्या चरित्रातही असे दाखले पाहून मात्र, अद्भूत घटना घडतच नाहीत असे कसे म्हणावे ? हे मला कळेनासे होते.

मान्य आहे. पण आव्हान स्वीकारून चमत्कार/अद्भूत घटना सुद्धा का घडत नसाव्यात? (ज्यांचा चमत्कार/अद्भूत घटनेवर विश्वास आहे आणि ज्यांना चमत्कार करणाऱे माहिती आहेत त्यांनी त्या अवलियांना जाहीर चमत्कार करावयाचा आग्रह का करू नये?)