नसीब मे जिसके जो लिखा था वो तेरी मेहफिल मे काम आया च्या चालीवर म्हणता आली.
प्रस्तुत गझलेसाठी ही चाल थोडी रडकी वाटत नाही का?
केवळ एखाद्या कवितेच्या वृत्तासाठी एखादी चाल व्यवस्थित जमते, म्हणून कुठलीही कविता कुठल्याही चालीवर म्हणणे कितपत योग्य आहे?
उद्या मनाचे श्लोक एखाद्याने 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो' च्या चालीवर म्हटलेले कसे वाटतील?
'कळा ज्या लागल्या जीवा' हे 'मुहब्बत ऐसी धडकन है'च्या चालीवर व्यवस्थित म्हणता येते (and vice versa - पहा प्रयत्न करून!). पण म्हणून ते तसे म्हणावे काय?
'प्रिया आज माझी नसे साथ द्याया' आणि 'नको भव्य वाडा, नको गाडि-घोडा, अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा' एकमेकांच्या चालींत म्हणता येतात. त्यांचे काय करावे?
फार काय, शाळेत असताना मराठी पद्यविभागात अनेक शार्दूलविक्रीडिते असत. पण म्हणून तोंडी परीक्षेत पाठांतराचा प्रश्न आला, तर 'युद्धांचे भडकून घोर वणवे राज्ये जळाली किती' हे मंगलाष्टकांच्या चालीवर म्हणून दाखवावे काय?*
(हिंदीच्या तोंडी परीक्षेत तर आम्ही मुले बऱ्याच वेगवेगळ्या कविता 'मेरा दिल ये पुकारे आजा'च्या चालीवर परीक्षकांस ऐकवून दाखवत असू, ते चांगलेच आठवते. परीक्षक बनण्याचे दुर्भाग्य लाभलेल्या शिक्षकास/शिक्षिकेस ते मुळीच आवडत नसे, पण विचारतो कोण?)
- टग्या.
*यावरून आठवले. एका लग्नात ब्यांडावर 'अंधे जहाँ के अंधे रास्ते, जायें तो जायें कहाँ' वाजवलेले या कानांनी ऐकलेले आठवते. निदान 'तेरी गलियों में ना रखेंगे कदम, आज के बाद' तरी वाजवायचे - समर्पक तरी झाले असते!