चक्रपाणिराव,
आम्ही मिलिंदरावांशी सहमत आहोत. ह्या कवितेमधून आपण पोटतिडीकीने ज़ो विचार मांडला आहे तो आम्हांस भिडला.
सहनशीलता अन् षंढता भिन्न आहे
ह्यासारख्या ओळींतली सहज़ता, परखडपणा विशेष नोंद घेण्यासारखा. कवितेचा विषयच भडक असल्यामुळे कदाचित चित्तोपंत म्हणतात तसा भडकपणा काही ठिकाणी आला असेल पण ह्या घडीला आपण मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत हे खरे.
भरुन बांगड्या घे वांझ या संयमाच्या
उडव कबुतरांना पांढऱ्या-शांततेच्या!
अत्यंत परखड प्रतिपादन! आपल्या नेतृत्वाने काही ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. कुणाही राष्ट्रप्रेमी व्यक्तीला चीड येईल असा हा अवेळी संयमाचा सल्ला आहे खरा.
आपला
(प्रक्षुब्ध) प्रवासी