प्रस्तुत गझलेसाठी ही चाल थोडी रडकी वाटत नाही का?
काही शेरांसाठी वाटते खरी. पण उडत्या चालीत "अत्तराचे" आणि "पत्थराचे" चांगले वाटणार नाही.
केवळ एखाद्या कवितेच्या वृत्तासाठी एखादी चाल व्यवस्थित जमते, म्हणून कुठलीही कविता कुठल्याही चालीवर म्हणणे कितपत योग्य आहे?
खरे आहे. पण हे कवितेला लागू आहे. गझलेत वेगवेगळ्या विषयांचे आणि वेगवेगळ्या मूड मधले शेर असू शकतात.
संगीतकारांना अडचण होऊ नये म्हणून गझलकारांनी परस्परविरोधीभावांचे शेर एका गझलेत लिहू नयेत असे सुचवावे काय? :)