मुसलमान पोलिसात भरती झाले तर होणारे फायदेः
- हिंदू पोलिस मुसलमानांवर अन्याय करतात असा समज कमी होईल. पोलिसांचं काम समाजावर ताबा ठेवणं आहे, त्यामुळे बहुसंक्ष्य पोलिस एका समाजाचे असतील तर दुसऱ्या समाजाला तो समाज आपल्यावर ताबा ठेवतो आहे अशी गुलामगिरीची भावना येऊ शकते. उद्या पुण्यातले बहुसंक्ष्य पोलिस तेलगू असतील तर चालेल आपल्याला?
- Intelligence gathering: मुसलमानांना त्यांचा कुठला मुल्ला दहशतवादी आणि कुठला शांततावादी हे जास्त चांगलं माहीत असणार... खबऱ्यांबरोबर rapport तयार करायलाही त्यांना जास्त चांगलं जमेल.
- Assimilation: मुख्य प्रवाहात मुसलमानांना सहभागी करून घेतलं गेलं तर दोन समाजातील संशयाचं वातावरण दूर व्हायला मदत होईल.
आणि घाबरण्यासारखं काय आहे? आपली क्षेपणास्त्र विकसीत करण्यात एक मुसलमानच अग्रणी होते. शिखांच्या दहशतवादाचा बीमोड शेवटी एका शिखाच्याच नेतृत्वाखाली झाला...
मराठी शब्द सुचवा: Intelligence gathering, Assimilation