हिंदू (चांद्र) महिन्यांची नावे ही नक्षत्रांवरून दिलेली आहेत. एखाद्या महिन्याच्या पौणिमेस चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्रावरून महिन्याचे नाव ठरते. चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो, वगैरे. खालील तक्ता पाहा-
महिन्याचे नाव पौर्णिमेचे चंद्रनक्षत्र
चैत्र चित्रा
वैशाख विशाखा
ज्येष्ठ ज्येष्ठा
श्रावण श्रवण
भाद्रपद पूर्वा भाद्रपदा
अश्विन अश्विनी
कार्तिक कृत्तिका
मार्गशीर्ष मृगशीर्ष
पौष पुष्य
माघ मघा
फाल्गुन पूर्वा फाल्गुनी
घरी कालनिर्णय असल्यास २००६ साठी हे पडताळून बघता येईल. आपला दिवस सूर्योदयाला सुरू होतो. सूर्योदयाला जी तिथी असेल ती त्या दिवसाची तिथी मानली जाते. मात्र तिथी चंद्रावर अवलंबून असल्यामुळे तिथी सूर्योदयालाच बदलेल असे नाही. त्यामुळे काही वेळा पौर्णिमे ऐवजी कृष्ण प्रतिपदेला त्या महिन्याचे नक्षत्र असल्याचे आढळेल. ही तफावत दिवसाची तिथी ठरविण्याच्या पद्धतीमुळे असते.