अप्रतिम कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण.

थोडे विषयांतर. खालील परिच्छेद हा माझे प्रकट चिंतन आहे. बघा पटतो का.  

समाजात एक चक्र फिरते आहे. पहिला खंड ब्राह्मवृत्तीचा, दुसरा क्षात्रवृत्तीचा, तिसरा वैश्यवृत्तीचा आणि चौथा शूद्रवृत्तीचा. ब्राह्मवृत्तीच्या कालखंडात तत्वनिष्ठा, ज्ञानोपासना, नीतिमत्ता, श्रमप्रतिष्ठा इ.इ. गोष्टींना आधारभूत मानून आचरण केले जाते. प्रत्येकाने आपापले काम करायचे कोणीही उच्च नाही कोणीही नीच नाही. नंतर येतो क्षात्रवृत्तीचा कालखंड. येथून उच्चनीचतेला सुरुवात होतो. कोणत्यातरी बळावर (सत्ता, अधिकार, शारीरिक बळ वगैरे...) अमुक एक जण मोठा आणि दुसरा लहान. त्याच्या पाठोपाठ येतो वैश्यवृत्तीचा कालखंड - स्वार्थ घेऊन. सत्ता, अधिकार, ज्ञानोपासना, नीतिमत्ता, तत्वनिष्ठा यांना घेऊन काय करायचे आहे? माझ्या (भौतिक) इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे झाले. बाकी कोणाचे काय जाते किंवा मिळते याच्याशी मला काय करायचे? आणि मग येतो शूद्रवृत्तीचा कालखंड. सगळाच अनागोंदी कारभार. माझे नुकसान झाले तरी चालेल पण दुसऱ्याचा फायदा झाला नाही पाहिजे.

सध्या आपण (सर्व जग) तिसऱ्या कालखंडातून चौथ्या कालखंडात प्रवेश करतो आहोत. तेंव्हा या सर्व गोष्टी अपरिहार्य आहेत असेच वाटते. अर्थात हे फक्त माझे विचार आहेत.

* मी दैववादी नाही.
* वृत्ती आणि जाती यात कृपया गल्लत करू नका