कवितेच्या दर्जाबद्दल बोलायला मी असमर्थ असलो, तरी कवितेमागील भावना पोचली, बरीचशी पटली.
शेवटच्या कडव्यातील विचारांमागील भावना समजण्यासारखी (आणि साहजिक) असली, तरी विचार निश्चित पटलेच, असे म्हणता येणार नाही. काहीतरी उपाय केला पाहिजे हे खरेच, पण भावनेच्या भरात, अविचाराने वार करून काहीही साध्य होणार नाही, झाले तर नुकसानच होईल. (गरज आहे तिथे वार करण्यास आक्षेप नाही, पण तो करायचाच झाल्यास पूर्ण विचाराअंती, योग्य वेळेस आणि पूर्ण पूर्वतयारीनिशी, calculated move म्हणून व्हायला हवा. उगीच आपले आला राग [कितीही सकारण असला तरी] की घुसले असे करून काहीच साध्य होत नाही. अर्थात भारतीय लष्करास - आणि कदाचित राजकारण्यांससुद्धा - तेवढी जाण आहेच.)
'मात्र स्वनिंदा, स्वतःच्या असहाय्य अवस्थेचे अभद्र वर्णन करणे हा काही उपाय होऊ शकत नाही.' या गोळेकाकांच्या विधानाशी सहमत. पण सर्वप्रथम भावनांच्या उद्रेकाला वाट करून देणे हे आवश्यक आहेच (त्याशिवाय विचार येणे अशक्य), आणि त्या दृष्टीने ही कविता ठीकच आहे.
गोळेकाकांच्या 'तेव्हा आपण सामर्थ्यशाली होणे हाच खरा उपाय दिसतो मला.' याही विधानाशी सहमत.
- टग्या.