मस्तच आहे तुमचा अनुभव! आम्ही पण एकदा छोट्या व्हिडिओ थिएटरमध्ये एक चित्रपट बघायला गेलो होतो. चित्रपटाचं नाव होतं "जॉन जॉनी जनार्दन". त्यावेळी (आणि अजूनही) मी अमिताभची भक्त होते. नसिबमधलं 'जॉन जॉनी जनार्दन' गाणं ऐकलं होतं, पण ते नसिबमधलं आहे हे माहित नव्हतं. गाण्यातल्या आणि चित्रपटाच्या नावातल्या साधर्म्यामुळं रडून, गोंधळ घालून मी आणि माझे २ मामे-भाऊ आम्ही तो चित्रपट बघायला गेलो. पण तो चित्रपट रजनीकांतचा होता हो!! आणि शिवाय त्यात त्याचा ट्रिपल रोल!! विचार करा किती मोठा पोपट झाला असेल आमचा??