कोबीची, पालकाची, मेथीची कोशिंबीर पण अशीच करतात. बारीक चिरलेला कोबी किंवा पालक किंवा मेथी (२ वाट्या) + दाण्याचे कूट (१ मोठा चमचा) + मीठ + साखर + लिंबू + मिरची एकत्र केले की झाली कोशिंबीर तयार.

कांद्याच्या पातीच्या कोशिंबीरीसाठी, कांद्याची बारीक चिरलेली पात + दही + मिरची + मीठ + साखर (आवडत असेल तरच) + लांब चिरलेली मिरची एकत्र करावे. मिरची लांब चिरली नाही तर पात आणि मिरची वेगळी ओळखता येत नाहीत, मिरची चावली जाऊन ठसका लागण्याची शक्यता आहे.

मोड आलेले मूग वाफवून किंवा नुसते मोड आलेली मटकी ह्याची कोशिंबीर पण छान लागते. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ, मिरची किंवा तिखट घालावे. जास्त आंबट आवडत असल्यास त्यात लिंबू पिळले तरी चालते. ह्यात चाट मसाला ही चांगला लागतो.