आपले सगळे विद्यमान राज्यकर्ते आणि त्यांचे सार्वकालिक लोंबत्ये [नोकरशहा] हे सर्व आजी/माजी साम्यवादीच आहेत. जे सध्या नाहीत, ते कधी ना कधी तरी साम्यवादाला हात लावून आलेलेच आहेत. जे एन यू मधील सर्व इतिहासकार, एन सी ई आर टी मधील सर्व शिक्षण अधिकारी जे देशभरातील शाळांचे अभ्यासक्रम निश्चित करतात, ९९% प्रथितयश वृत्तपत्रांचे शीर्षस्थ अधिकारी पत्रकार हे डावे [आणि साम्यवादी] असं असताना आणि उठता बसता शिव्या घालण्यासाठी पत्रकारांनी आणि राज्यकर्त्यांनी हिन्दुत्वाला वेठीस धरलेलं असताना नक्षलवाद्यांच्या 'मुक्तीदायी' कार्यक्रमाला त्यांनी विरोध का करावा? जे काही वर्तमानपत्रात वाचायला मिळतं ते अगदीच तोंडदेखलं असतं. सहा एक महिन्यांपूर्वी आठवत असेल तर याच साम्यांधांनी शेकडोंच्या संख्येने हल्ला करून बिहारमधील एक तुरुंग फ़ोडून त्यातून जवळपास सव्वाशे कैद्यांना मुक्ती दिली होती. लोकसत्तात एरवी बर्ड फ़्ल्यू विषयावर लिहायला घेतलेल्या अग्रलेखातसुद्धा संघाला देशद्रोही म्हटल्याशिवाय ज्या केतकरांची लेखणी पुढे सरकत नाही, त्या कुमारांनी त्या दिवशीच्या लेखात या नक्षली राक्षसांना पाठीशी घालण्यासाठी ज्या काही कोलांट्या मारल्या होत्या त्यांचा जवाब नाही [हेही ह्यातलेच]! वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या तोंडून या नक्षलवाद्यांचं क्रौर्य ऐकलं की अंगावर शहारे उभे राहतात.
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी नक्षलवादाचा हा राक्षस वाढत जाणार हे नक्की.
जी एस आणि नील, या ठिकाणी प्रभावी रीतीने प्रबोधन मांडल्याबद्दल आभारी आहे.