कवितेतली भावना भावणे आणि कविता रचना म्हणून आवडणे या कधी कधी दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. 'spontaneous overflow of powerful feelings' या व्याख्येप्रमाणे ही कविता एक भावनेचा उद्रेक म्हणून चांगली आहे. एखाद्या घटनेचा मनावर पगडा असताना आवडलेली रचना दुसऱ्या मूड्मध्ये तशीच वाटेल, असे नाही. काही व्यक्ती तटस्थपणे रसग्रहण करू शकतात. (चित्तचे रसग्रहण असे असावे.)
भरुन बांगड्या घे वांझ या संयमाच्या
उडव कबुतरांना पांढऱ्या-शांततेच्या!
सहनशीलता अन् षंढता भिन्न आहे
या ओळी मला स्वतःला खूप आवडल्या. उपहास आणि चीड चांगल्याप्रकारे व्यक्त केली आहे. पण मला राजकाराण्यांवरची टीका फारशी आवडली नाही.