वरदाताईंनी चांगले स्पष्टेकरण दिले आहे. त्यात थोडीशी भर टाकतो.
तिथी म्हणजे काय व तिचा चंद्राशी कोणता संबंध असतो हा प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे -
तिथी म्हणजे सूर्य व चंद्र यांच्यातील पृथ्वीकेंद्र धरून दिसणारे (ऍपरंट) कोनीय अंतर. ० अंश म्हणजे अमावास्या व १८० अंश म्हणजे पौर्णिमा. चंद्र रोज सुमारे २॥ तास उशीरा उगवत जातो व त्याचे रोजचे स्थान पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत जाते. याचाच अर्थ असा की हा कोन कळला की आपल्याला तिथी कोणती हे कळू शकते.
प्रत्यक्ष पाहून दोन प्रकारे तिथी ओळखता येते.
१. चंद्राचा काही भाग प्रकाशित असतो व उरलेला अप्रकाशित. प्रकाशित भाग पश्चिमेला असला की तो शुद्ध पक्ष असतो. एकदा पक्ष कळला की किती भाग प्रकाशित आहे त्यावरून तिथी कळते.
२. या प्रकाराची गंमत म्हणजे स्वतः चंद्र किंवा त्याचा किती भाग प्रकाशित आहे ते बघण्याची गरज नाही. कोणीही चंद्र पाहिलेला माणूस भेटला की फक्त त्याने किती वाजता आकाशात कुठे चंद्र पाहिला ते विचारावे (स्वतः पाहिले तर स्वतःच ते नोंदवावे). एवढ्या माहितीवरून सूर्य-चंद्रामधील कोन व त्यावरून तिथी थोड्या आकडेमोडीने सहज कळते.
जाता-जाताः moon या शब्दाचा जुना अर्थ month असा होता. तसेच उर्दूमध्येही माह या शब्दाचा अर्थ चंद्र होतो (उदा. माहजबीं, माहरुख़, इ.).
म्हणजे पूर्वी सर्वत्र चांद्रमासच होते या तर्काला पुष्टी मिळते.
दिगम्भा