अभिजीत, तुम्ही म्हणता ते खरेच आहे.
मात्र, दंभ लोकांतच वाढत आहे असे नसून आपणही दंभाच्या कड्यावरच
आहोत की काय असा मला संशय येतो. असे वाटते कीः
आज या साऱ्याच वस्त्या, आकाश भेदू लागल्या ।
आमचे 'टॉवर्स' चढले, 'हाईटस्' तुमच्या वाढल्या ॥
हस्तिदंती जे मनोरे दुर्लंघ्य कधी मज भासले ।
आज ते आमच्या घरांतून वाकून खाली पाहिले ॥
'वैशिष्ट्य'* आमुच्या जीवनातील जसजसे फोफावले ।
प्रत्येक व्यक्ती मानते, 'मज आकाश खाली गावले' ॥
'संपन्न अनुभूती येथली आणि अभिव्यक्ती गणू मी किती' ।
'या जरा इकडे पाहा, हे दर्शन तुम्हा कधी लाभले?' ॥
* स्पेशलायझेशन