नितीन,

तुमचे सत्यकथन वाचून तुमच्या गुरूमहाराजांना भेटायची जबरदस्त इच्छा मनात निर्माण झाली आहे. हा अनुभव तुम्ही तुमच्यापुरताच मर्यादित ठेवून माझ्यासारख्यांना गुरूमहाराजांच्या मार्गदर्शनापासून वंचित का ठेवू इच्छिता ते कळत नाही. इतरांना अद्भुत अनुभव कथनासाठी पाचारण करून त्यांनाही 'जरूर ती गुप्तता' पाळण्यास परवानगी देता आहात. कृपया आपण असे न करता गुरूमहाराजांचा पत्ता सांगावा ही विनंती.