दिगम्भा, 'यशस्वी शब्दां'चे कौतुक करण्याचा तुमचा हा उपक्रम खूपच छान आहे. बरेच भाषिक दोस्त असल्याने माझ्या बोलण्यात त्या-त्या भाषांमधले काही कारणांनी मला भावलेले शब्द माझ्या नेहमीच्या बोलण्यात सर्रास वापरले जातात. त्यामुळेच मराठी साहित्यात काय होते आणि काय नव्हते, काय नविन तर काय जुने हे मला माहिती नाही. तुमच्या या चर्चेत 'यशस्वी शब्द' सांगून सहभागी होणे शक्य नाही पण तरीही इथे नमूद प्रतिसादांमुळे माझ्या ज्ञानात भर पडेल अशी आशा आहे आणि काहीशी खात्रीही. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी तुम्हाला शुभेच्छा.