मराठीत पुरस्कार हा शब्द पहिल्यापासून आहेच. त्याचा गैरवापर हल्ली-हल्ली सुरू झाला आहे.
मूळ शब्दाचा अर्थ - एखादी गोष्ट (वा तत्त्व) समाजासमोर मांडणे, तिला पाठिंबा देणे, तिच्यामागे ठामपणे उभे राहणे, तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी झटणे असा काहीतरी होतो. इंग्रजीत याला to champion (a cause)  म्हणतात.
उदा. र. धों. कर्वे यांनी संततिनियमनाचा सतत पुरस्कार केला, ते त्याचे आद्य पुरस्कर्ते होते.
सध्याच्या फ्याशनप्रमाणे "पारितोषिक" या अर्थाने हा शब्द वापरण्यात येतो, हा प्रभाव हिंदीचा व मुख्य दोष आपल्या मूर्ख/आळशीपणे अंधानुकरण करणाऱ्या सर्व प्रसिद्धीमाध्यमांचा. पण हे ऐकतो कोण?
पारड्यात आणखी एक भारी वजन पडलेले आहे त्या ज्ञानपीठ पुरस्काराचे.
एकूण शत्रूंनी गड काबीज केला आहे खरा.
दिगम्भा