आता म्हणे
ते पाडणार आहेत ताज-महाल आणि
तिथं बांधणार आहेत नवा 'ताज-मॉल' !

त्यासाठी कधीच येऊन पोचलेत परदेशातून 'मेसन्स'
आणि देशी गवंड्याचे हात छाटून टाकल्या गेलेत केंव्हाच.


कविता इथपर्यंतचा प्रवास चांगला करते. इथेच कविता थांबवली असती तरे बरे झाले असते. कुठे थांबायला हवे हे कवीला माहीत असायला हवे आणि कोटी म्हणजे कविता नाही असे बडेबुजुर्ग नेहमी म्हणायचे. असो.

पुढे विटा (किंवा बिल्डिंग ब्लॉक्स म्हणा) योग्य ठिकाणी बसलेल्या नाहीत. काही विटा दुसऱ्याच कारखान्यातल्या आहेत. साहिर लुधियानवीच्या शेर वजनात फिरवला असता तर बरे झाले असते.  शेवटी उगाच शहाजहान आला आहे.

चित्तरंजन