सदर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

विचार -

मी कोठेतरी गांधी असे नाव वाचले. चुभूद्याघ्या.

कदाचित या गृहस्थाला मारायला मी लगेच तयार होणार नाही. त्याने स्वतःच्या पत्नीसाठी असा टोकाचा मार्ग स्वीकारला असे समजते. गांधी कुटंबीयही कमालीच्या समजूतदारपणे या गृहस्थास आवश्यक ती मदत करण्यास पुढे येत आहेत असे समजले.

या गृहस्थाने अंतिम संस्कार केले नसते तर नेमकी काय परिस्थिती असती हे मला माहीत नाही. गांधी कुटुंबीयांस अंतिम दर्शन झाले असते की दुसरे काही हे माहीत नाही.

विनंती -

सर्व मनोगतींनी आधीच दुःखात असलेल्या सदर कुटुंबीयास (शहा/गांधी) आणखी वेदना होतील असे लिखाण टाळावे. नेहमी विचार करत असलोच तरीही येथे प्रतिसाद देताना आणखी एखादा क्षण तपासून पहावे.