श्री.दिगम्भा यानी एक चांगला विषय चर्चेसाठी पुढे ठेवला आहे,पण त्यानी दिलेल्या उदाहरणातील एक हुतात्मा सोडला तर सर्वच शब्द पूर्वीपासून मराठीत होतेच.भावणे हा शब्द जो ते कुठुनतरी आला म्हणतात तो ज्ञानेश्वरीत आहे पहा-
मनीं जें भावावें।बोलावें वाचें ज्ञानेश्वरी ८.७६९. ,पालक,पुरस्कार हेही शब्द नवीन नाहीत.पैस,पौर्वापर्य श्रीमती दुर्गा भागवत आणि अशोक रानडे यानी वापरले पण ते पूर्वीही फारसे वापरले गेले नाहीत त्यामुळे लोकाना भावले नसतील.मेन्टॅलिटीला मनोवृत्ती हाच शब्द बरोबर आहे पण मानसिकता हा सायकॉलॉजीला (त्याची सायकॉलॉजी मला कळत नाही)प्रतिशब्द म्हणून वापरायला हरकत नाही. अभियांत्रिकि क्षेत्रात बरेच नवे शब्द रूढ झाले त्यातील काहींचा उल्लेख कागदी वाघ यानी केला आहे.