निव्वळ अप्रतिम..... साधेच शब्द, .मनाचा ठाव घेणारे..डोळ्याच्या कडा ओलावणारे...... अंतर्मुख करणारे.....ही रचना कोणाची आहे?..कारण खाली संकलन असे लिहिले आहे
आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं गाव असतं! ..वा वा
आई असतो
एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा....सगळ्या नभाला व्यापुन उरणारे शब्द!
ह्या कवितेतील प्रत्येक ओळ कायमची हृदयात साठवुन ठेवण्यासारखी आहे!
-मानस६