मला इथे एक लेख प्रसिद्ध करावासा वाटतो...

अर्थात लेखातील सर्वच बाबतींशी मी सहमत नाही. पण ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे.

http://gadhav.blogsome.com/2006/07/10/p10/ यावरून...

--------------------------

या गाढव समाजात वावरताना मला बरेचदा काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

आपण का जगतो? इतर प्राणी, झाडे, पक्षी का जगतात?
बरे फक्त जगतच नाही तर नवीन जीवांना जन्मदेखील देतो.
इतरांच ठीक आहे निसर्गानं आखून दिलेल्या रस्त्याने जायचं, जगायचं - मरायचं.

आपण मात्र संस्कृतीच्या नावाखाली स्वतःला नको तो त्रास देत असतो. उगाचच सु-संस्कृत असल्याचा दिखावा करतो.
नर-मादी हे साध सरळ नात सोडून आपण नवी नाती तयार केली. त्यांच्या जंजाळात अडकलो. कशासाठी?

योग्य त्या वयात प्रणयक्रिडा करणे आपण सोडून दिले. आता तर लग्नाचे वय विनाकारण वाढवले. कशासाठी?
तर बदललेली संस्कृती.. मग आपल्या भावनांना इतर मार्गाने वाट करून द्यायची. मैथुनासारखे प्रकार त्यातलेच.

कशासाठी हे सगळं?

बरं विवाहपूर्व संबंधांना तथाकथित संस्कृती रक्षकांचा विरोध. का?
जर शारीरिक गरजा योग्य त्या वेळेस दोघांच्या अनुमतीने भागवल्या तर हरकत कशाला?
१८-२१ वर्षावरील मुलं जर लग्नाचे निर्णय घेऊ शकतात तर विवाहपूर्व संबंधांना कायदेशीर मान्यता का नको?.

संस्कृतीच्या नावाखाली निसर्गाशी वैर कशाला?

--------------------------