आपल्या इथे फक्त महिन्याभराच्या ओळखी वर लग्न करणे कितपत बरोबर आहे?

सर्वप्रथम, हा सदर चर्चेपेक्षा ('लग्नापूर्वीचे संबंध योग्य का?') पूर्णपणे वेगळा चर्चाविषय आहे.

आता यावर माझे मत: काहीही फरक पडत नाही. दोघांचीही एकमेकांना समजून घेऊन राहण्याची इच्छा असेल, तर आठवडाभराची ओळख पुरते. नाहीतर वर्षानुवर्षांच्या ओळखीनेही काही होत नाही.

अर्थात basicsमध्ये दोघांचे एकमत होते की नाही हे जाणणे आवश्यक आहेच, (आणि ही basics नेमकी कोणती यासाठी प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकेल,) पण हे साधारण दोनतीन भेटींतही स्पष्ट होऊ शकते. त्यानंतर मात्र दोघाजणांची एकमेकांना adjust होण्याची इच्छा किती प्रबळ आहे यावर सर्व अवलंबून आहे.

किंबहुना अतिप्रदीर्घ परिचय (नियोजित विवाहाच्या बाबतीत) कदाचित counterproductiveच ठरावा, असे वाटते. कारण मग एकमेकांच्या निश्चितपणे चांगल्या नसलेल्या (वाईट हा शब्द मुद्दामच वापरत नाही. न आवडणाऱ्या गोष्टी निश्चितपणे वाईटच असाव्या लागतात असे नाही, trivialही असू शकतात. शिवाय एकमेकांना overanalyze करण्याचाही धोका असतोच.) नको तितक्या गोष्टी दिसून येऊन 'मग यात आपल्याला निश्चितपणे पडायचेच आहे का?' अशा प्रकारच्या (निरर्थक) शंकाकुशंका येऊ लागू शकतात. आणि एकदा ते होऊ लागले, की it is all downhill from there onwards.

- टग्या.