वाढता व्यापार आणि त्यामुळे परस्परावलंबी देश आणि अर्थव्यवस्था यामुळे जागतिक महायुद्ध होण्यासाठी लागणाऱ्या दोन भक्कम बाजू बनणे अवघड आहे. त्यामुळे महायुद्ध होणे अशक्य नसले तरी अवघड निश्चितच बनले आहे.

आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही सकाळी खर्च केलेल्या रुपयाचा काही भाग संध्याकाळपर्यंत दुसऱ्या देशातल्या माणसाच्या उत्पन्नात धरला जातो आहे. जसजसे तो रुपया वाटून घेणारे देश वाढत जातील तशी जागतिक महायुद्धाची शक्यता कमी होत जाईल असे वाटते.

वरील एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तिसरे महायुद्ध एखाद्या वृत्ती अथवा प्रवृत्तीविरुद्ध असेल असे वाटते.