कुणी अतिथी (अगदी देवही वेष बदलून आला असला तरी काय झाले?) येतो काय आणि यजमानाच्या लहान मुलाच्या मांसाची मागणी काय करतो आणि यजमान ढुंगणावर लाथ मारुन त्या अतिथीला हाकलून द्यायचे सोडून त्याची ती किळसवाणी इच्छा पुरी करतो.
खरोखर आजच्या काळात ही गोष्ट अत्यंत मूर्खपणाची वाटते. ज्या देवाला भक्ताची असली असुरी परीक्षा घ्यावीशी वाटते तो देव, जो भक्त असल्या परीक्षेत पूर्ण मार्क मिळवून पास होतो तो भक्त आणि असली कथा भक्तीभावाने डोळे टिपत ऐकतात ते भगतगण ह्या सर्वांची कीव करावीशी वाटते.
असो.