वारांची नावे सर्वप्रथम इजिप्त मधे ठरवण्यात आली. तत्कालीन समजूती नुसार पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असून शनी हा पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह धरला जाई, त्यानंतर गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध व सगळ्यात जवळचा ग्रह म्हणून चंद्राची गणना होत असे. यापुढे प्रत्येक दिवशी एक ग्रह आधिपात्य करतो अशी समजूत करून शनी पासून आठवड्याची सुरुवात केली जात असे.
हे वारांचे कॅलेंडर इजिप्त पासून पुढे रोम पर्यंत पसरल्याने बऱ्याच युरोपिय देशांत ग्रहगोलांवरून वार ठरवलेले दिसतात. भारतात याची सुरूवात संमांतर रित्या झाली की काय आणि कशी झाली याबद्दल विशेष माहिती मिळू शकली नाही.
कालांतराने चंद्र देवतेचे महत्व कमी होऊन सूर्यदेवतेस महत्व प्राप्त झाल्यावर आठवड्याची सुरूवात रविवारापासून होऊ लागली.
इंग्रजी वार
इंग्रजी वार हे सरसकट ग्रहगोलांवरून ठरलेले नाहीत. तर त्यांची नावे काही ऍंग्लो सॅक्सन आणि नॉर्स देव देवतांवरूनही पडलेली आहेत.
Sunday - सूर्यदेवते वरुन पडलेले नाव.
Monday - चंद्र देवतेवरुन पडलेले नाव.
Tuesday - टीअर (Tyr) या नॉर्स युद्ध देवतेवरुन ठेवलेले नाव (रोमन लोकांनी हेच नाव मार्स वरुन ठेवले)
Wednesday - ओडिन (अपभ्रंश वोडिन) सर्व देवांचा राजा यावरून वेनसडे किंवा वेड्नस डे हे नाव पडले.
Thurday - थॉर या वीजा, वादळ, गडगडाट घडवून आणणाऱ्या नॉर्स देवावरुन थर्सडे हे नाव पडले.
Friday - ओडिन या देवाची पत्नी आणि गृहसौख्याची नॉर्स देवता फ्रिगा हिच्या नावावरुन फ्रायडे हे नाव पडले.
Saturday- हे नाव अर्थातच शनि ग्रहावरुन.
इतर भाषांतील वारांची अधिक माहिती येथे मिळेल.
प्रियाली
चू. भू. दे. घे.