संबंध कोणते? - लग्नापूर्वीचे की लग्नाशिवायचे?

येथील चर्चेमध्ये संबंधांनंतर लग्न व्हावे किंवा त्यासाठीच संबंध ठेवावे अशी थोडीफार धारणा दिसते. पण कोणास लग्न नकोच असेल आणि परस्परखुशीने संबंध ठेवायचे असतील तर आपण कोण आडवे येणार?

एकूण आयुष्यात काय करायचे, काय साधायचे याचा आणि संबंध कधी ठेवायचे याचा काहीही संबंध नाही. किंबहुना उगाच मनं कुढत राहण्यापेक्षा मनमोकळेपणाने जगत असतील, चार क्षण कोणी सुखात घालवीत असतील तर आपली काहीही ना नाही. कोणाची यांस मान्यता नसेल तर त्यापासून बाजूला राहा. तसे केले म्हणजे मागासपणाचा शिक्काही बिलकुल लागण्याचे कारण नाही.

असो... बराच उशीर झाला आहे... बडबड थांबवतो...