कविता इथपर्यंतचा प्रवास चांगला करते. इथेच कविता थांबवली असती तरे बरे झाले असते. कुठे थांबायला हवे हे कवीला माहीत असायला हवे आणि कोटी म्हणजे कविता नाही असे बडेबुजुर्ग नेहमी म्हणायचे. असो.

पुढे विटा (किंवा बिल्डिंग ब्लॉक्स म्हणा) योग्य ठिकाणी बसलेल्या नाहीत. काही विटा दुसऱ्याच कारखान्यातल्या आहेत. साहिर लुधियानवीच्या शेर वजनात फिरवला असता तर बरे झाले असते.  शेवटी उगाच शहाजहान आला आहे.
चित्त,
परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
साहिर लुधियानवीच्या शेर वजनात फिरवला असता..
ह्यात व्याकरणशुध्द शेरापेक्षा त्याला असा शेर लिहायला लावणारी अगतिकता( व त्या अनुषंगाने उपरोध) मांडणे हे जास्त महत्वाचे होते/आहे.

काही विटा दुसऱ्याच कारखान्यातल्या आहेत
-- हे समजले नाही.

शेवटी उगाच शहाजहान आला आहे
मला शहाजहानची वेदना(जे चालले आहे ते तेंव्हाही व आजही असहायपणे पाहणे) तेव्हढीच महत्वाची वाटते.म्हणूनच कविता ही वेदना मांडल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

जयन्ता५२