छायाताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी सुद्धा ऐवजी किती ठेवू शकलो असतो. तिथे सुद्धा जाणीवपूर्वक वापरला आहे.मला सुद्धा तिथे हवेच होते.
सुद्धाचा उच्चार करताना द् ह्या वर्णाचा उच्चार करू नका.सुद्धाचा उच्चार सुधा करा. तुम्हाला गुणगुणताना त्रास होणार नाही.
बरेचदा आपण बोलताना द् वर एवढा आघात देत नाही. हे पुन्हा सारखेच. पुन्हा चा उच्चार काही जण पुन् न्हा ही करतात आणि बरेचसे उन्हासारखा करतात.
चित्तरंजन
अवांतर
इंग्रजी भाषेत शब्द उच्चारताना त्यांचे वीक फॉर्म किंवा स्ट्रॉंग फॉर्म वापरले जातात.
जसे द, ए ह्या डेफिनट आर्टिकलचा उच्चार वाक्यात त्याचे स्थान कुठे आहे, संदर्भ काय आहे ह्यानुसार बदलते.
उदा. ही इज दी मॅन टू बीट. ह्यात दी चा फॉर्म स्ट्राँग आहे.
पण बाय द वे मध्ये तो वीक फॉर्म आहे.
तसेच ते मराठीतही आम्ही वापरतो, असे माझे व्याकरणाचे ज्ञान अत्यंत तुटपुंजे असताना म्हणावेसे वाटते.