वृकोदराशी सहमत.  माझा मुलाला (निखिल) सैन्याचे अतिशय वेड होत. अभियान्त्रिकेच्या शेवटच्या वर्षाला असतानाच  SSB उत्तीर्ण झाला पण गुणवत्ता यादीत त्याचे नाव आले नाही. नंतर त्याने दोन SSB  उत्तीर्ण झाला व गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर होता. मागच्या जुलै महिन्यात एक वर्षाच्या परीक्षणाकरिता डेहराडूनला गेला. माझा ऊर अभिमानाने दाटून आला होता. आमच्या खानदानात कोणीही सैन्यात नाही. मी एका सैनिक अधिकाऱ्याची आई म्हणून मिरवणार होते. चहुबाजुने होणारे कौतुक झेलत POP ( Passing our Parade) चे स्वप्न बघण्यात मशगुल झाले. जवळपास रोज फोनवर बोलणं होत होत. सरुवातीचे आठ दिवस छान गेले. प्रशिक्षण खूप खडतर असत खूप वाईट वागणूक देतात, छळ करतात हे सगळं माहीत होत तरी खूप काळजी वाटायची. नंतरचे आठ दिवस बरे गेले. नंतर रोज रडायचा. आम्ही त्याची समजूत घालायचो, एकदा सवय झाली की काही वाटणार नाही. पहिले दोन तीन महिने कठीणच असतात वेगैरे पण व्यर्थ. मला वापस यायचं हाच हट्ट करायचा.लक्ष्य सिनेमाची पारायण केलेली. ऐकायला तयारच नाही. मी माझं आयुष्य इथल्या लोकानसारख frustration मध्ये काढणार नाही. माझी अशी कोणतीही मजबूरी नाही तर मग अस आयुष्य का काढू . मला इथे आल्यावर खरी परिस्थिती कळली. शेवटी आम्हालाही ही गोष्ट पटली व आम्ही त्याला वापस बोलावून घेतलं. ही झाली माझ्या मुलाची गोष्ट. माझ्या परिचित काकू त्यांचा नातू. वडील नेव्हीत विमान अपघातात मृत्यू पावलेले. मुलाला फक्त नेव्हीतच जायचे होते त्याप्रमाणे गेलाही. आता दोन वर्षानंतर सोडून वापस येतोय  Bond चे  भरमसाठ पैसे भरून. हे काय दर्शवतंय ?  मनोगतवर आणखीन एक चर्चा वाचण्यात आली मराठी माणसा पैसे कमव. त्याकरिता ३० जूनचा लोकसत्ता वाचा. आपण मराठी लोकच आकडेमोड करत असतो आपले लोक धन्द्यात किती? सैन्यात किती ? परदेशात किती?  मला वाटत अस कुठलही क्षेत्र नाही ज्यात मराठी माणूस नाही.