नम्र विनंती,
शिवाजी महाराज, शहाजी राजे, जिजाऊ आणि इतर... अशी बरीच मंडळी महाराष्ट्राची आदराची/श्रध्देची स्थाने आहेत. त्यांचे बाबत जाणुन घेण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर आगोदर स्वतः काही पुस्तके वाचावीत जी अगदी सहज उपलब्ध आहेत. उदा.
श्रीमान योगी - जरी कादंबरी असली तरी बरीच माहीती पूर्ण आहे
बाबासाहेब पुअरंदरे लिखित, राजा शिवछत्रपती . हे तर अगदी सनावळीसह उपलब्ध आहे.
या पुस्तकांच्या किंमती फ़ार नाहीत... (रू ४०० - ५०० च्या आसपास)
महाजालावर येवुन पिंक टाकल्यासारखे प्रश्न किमान "अशा" व्यक्तिमत्वांविषयी तरी करू नयेत.
---------------------------------------------
माधव कुलकर्णी - मता मुस्लीम नायकीण, इचा उतारा देण्याचा उद्देश लक्षात घ्यावा. जिजाऊने शिवाजीराजांवर काय संस्कार केले, कसे केले हे दाखवण्याचा उद्देश आहे. असे मज पामाराला वाटते.
आता शिवाजीमहाराजांच्या जीवानात किंवा इतिहासात जर खरेच त्या मताने काही कामगिरी केली असती/ ठसा उमटवला असता तर तिचा पुढे उल्लेख झाला असता.
ज्या पात्रांचा राजांच्या जीवनावर किंवा एकुणच समाजावर/इतिहासावर काहीच ठसा नाही त्यांच्याबद्दल माहीती कशी उपलब्ध होऊ शकेल.
उगाच मूळ मुद्द्यापासुन चर्चा भरकटवण्यास मदत करण्यारत काय गंमत?
-----------------------------------------
वृकोदर, चर्चा आपण वेगळ्यामुद्याने सुरू करून नंतर नको तो मुद्दा उपस्थित करत आहत.
नवराबायकोने वेगळे राहणेः त्यावेळची परिस्थीती आपण लक्षात घेतली का? शहाजीराजांची कोंडी केली गेली होती. आणि त्यांना जाणुन बुजुन महारष्ट्रापासुन दूर ठेवले गेले.
दुसरे असे की, शिवाजी राजे मोठे झाल्यावर त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली. तेव्हा शहाजी शिवाजी एकत्र आले तर सगळेच संपेल या भीतीने बाकीच्या बादशाहींनी या दोघांना एकमेकांपासुन दूर ठेवणेच हिताचे मानले.
शहाजींनी सुध्दा असा विचार केला, की आपण बाजुला राहीलो तर शिवाजी राजांना मोकळेपणाने स्वनिर्णयाने स्वराज्याचा कारभार चालवता येवु शकेल.
आणि सर्वात महत्वाचे, नवराबायकोच्या संबंधापेक्षा त्यांना तुमच्या आमच्यासारख्या जनतेची काळजी होती. त्यांनी त्यांचा संसार केला अस्ता तर आज महारष्ट्राचा सम्सार उभा राहीलेला कोणाला दिसला नसता.
हेच कटु सत्य आहे. (स्वातंत्र्य संग्रामातही अनेकांनी स्वतःचे संसार धुळीस मिळवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेच की)
आपण काही प्रयत्न करून ज्ञान वाढवण्याचा, माहीती मिळवण्याचा यत्न केलाय का? की महाजालावर असे प्रश्न टाकून रिकामे होण्याचा, "शॉर्ट काट" अवलंबताय?
वर सांगितलेली पुस्तके वाचा. आपला समज/ गैरसमज दूर नाही झाले तर जरूर नविन चर्चा चालु करा ... तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तरे देवुच!
-------------------------------------------------
विनायकः पहीला प्रतीसाद वाचुन वाटले की आपण चांगले माहीतगार/अभ्यासु आहात.
परंतु नंतररच्या प्रतिसादाने आघात केलात.
शहाजीला नाच- गाणे करणार्या स्त्रियांमध्येही रस होता. तसेच जिजाबाई त्याची नावडती राणी असणेही शक्य आहे. ह्या सर्व गोष्टी त्याचे दोष म्हणून सांगत नाही, तर जिजाबाईबरोबर पुण्यास न राहण्यामागची कारणे असण्याच्या शक्यता म्हणून सांगतो.
शहाजी राजे सुरूवातीपासुन मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये वावरले. त्यामूळे त्यांच्यामध्ये नाच गाणे बघणे/ऐकणे हे ओघाणे आले. परंतु ते त्याच्या कधीही आहारी गेले नव्हते.
राहीला प्रश्न जिजाऊ नावडती असण्याचा. तर तसे काही नव्हते. जिजाऊ ही त्यांची आवडती पत्नी होती. आणि दोघांच्या वेगळे राहण्याची काही कारणे वर नमुद केली आहेतच.
दुसरे असे की कर्नाटकात जेव्हा शिवाजीराजे आणि जिजाऊ रहायला गेल्या तेव्हा त्यांना तेथील एकूणच वातावर भावले नाही.
शिवाजी राजे अशा वातावरणात राहुन स्वराज्याचे स्वप्न कसे साकारणार? हाच प्रश्न दोघांना (जिजाऊ आणि शहाजी) होता. त्यामुळे शहाजींनी आणि जिजाऊ नी निर्णय घेतला की शिवाजीराजांना घेऊन जिजाऊ ने पुण्यात परत जावे, आणि स्वराज्या स्थापावे.
स्वराज्य ही फ़क्त शिवाजी राजांची कल्पना नव्हती. तिची मुहुर्त मेढ शहाजी राजांनी आधीच घातली होती. भले तो प्रयत्न फ़सला!
परंतु आपले स्वप्न आपल्या मुलाला हाताशी धरून जिजाऊने साकारावे हीच प्रबळ इच्छा शहाजींना होती.
विनायकराव, एक विनंती, आपण अभ्यासु आहात. थोडेसे संदर्भ वाचले, विचार केलात तर राजांनी असे का केले असेल याचे विश्लेषण आपण खरच सहज, सुंदर आणि बहुतांशी लोकांना पटेल असे करू शकाल.
आपल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम मला वाटतो, की आपण चांगले शोधण्याचा यत्न करत नाही नको त्या गोष्टींना महत्व देतो. आणि उगाच उकाळ्या पाकाळ्या काढल्यासारखे नको ते प्रश्न जगासमोर मांडतो.
प्रत्येकाने थोडासा "सकारात्मक" प्रयत्न/विचार करून बघावा, "हे असे का घडले असेल?" तर नक्कीच चांगली कारणे/उत्तरे मिळु शकतील.
नकारात्मकच शोधायचे तर त्याला फ़ारसे "डोके" लागते असे वाटत नाही.
जर आपण सगळ्यांनी नकारात्मक दृष्टी ठेवली तर बाहेरचे जेम्स लेन नाही लागणर ... इथलेच पूरे की...
आपण सगळे ज्ञानी आहात , चांगले शोधण्याचा प्रयत्न करा आणि सकळजनाना सांगा...
येवढीच नम्र विनंती.
मग बाहेरचे "जेम्स लेन" वगैरे आपल्याकडे आणि आपल्या श्रध्दास्थानाकडे वाकड्या नजरे बघणार नाहीत.
आणि हो, उगाच डिस्क्लेमर टाकायची गरज नाही लागणार....
चुकले असेल तर नक्की सांगा सुधारणा नक्कीच करीन
आपलाच,
--सचिन