शिवचरित्रावर चर्चा हा समाज विभागणीचा विषय झालाय.

ज्या महापुरूषानी माणसं जोडून स्वराज्य निर्माण केलं त्याच्या बद्दलची चर्चा / इतिहास संशोधन / लेखन /व्याख्यानं आज समाज तोडू पहात आहे.

एका बाजूला अभिमानास्पद विषयांबरोबर वादग्रस्त मुद्यांवर चर्चा करणारे आहेत आणि दुसऱ्या बाजूला फ़क्त चांगलच बोला (वाईट काही बोलू नका आणि इतिहासातून शोधू नका) म्हणणारे.

२-४ महिन्यांपूर्वी निनाद बेडेकरांनी फ़क्त एका समाजानी शिवचरित्रावर काही लिहू बोलू नये असं भाष्य केलं होतं.

आता, समस्त मराठी मंडळींनी शिवचरित्रावर लिहू बोलू नये असं म्हणायची वेळ आली आहे.

इतिहास संशोधन आणि संशोधनाच समर्थन म्हणजे सारखी सारखी तीच तीच कबर खोदून, कबरीतून वेगळ हाडूक काढून, माझंच हाडूक खरं म्हणणं असा प्रकार झाला आहे.

असो.