महेश शिऊरकरजी,

आपला घोटाळा झाला आहे. ही कविता माझी नाही तर श्री. तुषार जोशी यांचीच असून ती माझी म्हणजे अभिजित पापळकरची आवडती आहे. मी ती त्यांच्या ब्लॉगवरती वाचली व ती येथे देण्याची विनंती केली होती व त्यांनी ती पूर्वीच असल्याने त्याचा दुवा दिला आहे. तेव्हा ही साधी पण  अत्यंत प्रेरणादायी कविता अभिनंदनास पात्र आहेच आणि म्हणून तुषार यांचे आपल्या बरोबर मीही अभिनंदन करतो. मात्र त्यांचे श्रेय त्यांना आणि त्यांनाच जावे हीच इच्छा. त्यांनी गड राखला आहे, आमची उमेदवारी चालू आहे. धन्यवाद !

(पारदर्शक ) अभिजित