रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले? असे सावरकरांनी म्हटलेच आहे.
राजकीय स्वातंत्र्य असो वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, त्याची किंमत मोजावी लागते. जात्यातले रडतात व सुपातले हसतात असे म्हणतात. ब्लॉगर आज बंद केला गेला आहे अशीच मुस्कटदाबी इतर साईटची होऊ शकते कारण सरकारने काहीच नियम जाहीर केलेले नाहीत. नेमक्या किती व कोणत्या साईट बंद केल्या आहेत ते माहीत नाही. त्या का बंद केल्या त्याचे स्पष्टीकरण नाही. भविष्यात कोणत्या साईट कोण व का बंद करणार याचाही खुलासा नाही.
ही दुसऱ्या आणीबाणीची नांदी आहे.