सगळ्यांच्या इतक्या छान प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार.
भाऊ, नकारात्मक वाटली तुम्हाला? मला नाही तसं वाटत. बऱ्याच ठिकाणी ही fact आहे. बऱ्याच ठिकाणी ह्याच्यासाठी म्हटलं कारण आपण मराठी लोक त्यामानाने बरेच पुढारलेल्या विचारांचे आहोत. मला इथे कुवेतला तर खूपच जाणवतं. आपल्या घरांमधे इतका मोकळेपणा असतो ना, त्यामानाने नॉर्थ, साऊथ मधले लोक खूप मागासलेल्या आणि बुरसटलेल्या विचारांचे असतात. आपला फ़्रीडम बघून नाकंसुद्धा मुरडतात. त्यांच्या बायकांना हा फ़्रीडम नकोच असतो, कदाचित त्यांच्यात confidence नसल्यामुळे किंवा त्यांची तशाच प्रकारे वाढ झाल्यामुळे असेल कदाचित. त्यांना मनापासून तसं वाटतंच नाही मुळी.
शीला, मला नाही वाटत आपण आपली कीव करावी. निदान आपल्या मराठी लोकांमधे तरी आजकाल असं फ़ारसं दिसत नाही.
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मला लहानपणापासून आजतागायत इतकं मोकळं वातावरण मिळालं ना, की मी कधीच बंदिनी नव्हते. पण हे काही सर्रास बघायला निश्चितच मिळत नाही.