मी आधी म्हणाल्याप्रमाणे मला असेच वाटते की हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मुक्ता पुराणिक यांचे म्हणणे पटते की- प्रत्येकाने आपल्या सदसद्विवेक बुद्धीला हा प्रश्न विचारावा.

जर असे संबंध ठेवायचे असतील तर मग लग्नाची तरी गरज काय ?
अगदी मान्य.

पण या संबंधांच्या मागे हाच विचार नसेल कशावरून की लग्न करायचे की नाही याचसाठी जोडीदार पारखून घेणे आहे.

आपली संस्कृती हा आपल्याकडील अनमोल ठेवा आहे.  संस्कृती  वर अतिक्रमण व्हायला संस्कृती म्हणजे काही अनधिकृत बांधकाम नव्हे.

हे ही पटले, पण महाराष्ट्र सोडून इतर अमराठी लोकांमध्येतर ही संस्कृती जोर धरू लागली आहे. त्यांच्या या वाढत्या प्रवृत्तीला आपण कसे बरे अडवू शकू याचाही विचार करायला हवा.

चिकू