वाह!! आपण चांगली चर्चा सुरू केली आहे. काही ना काही कारणाने मतदार यादीत माझे नावच नसायचे त्यामुळे इच्छा असून सुद्धा मतदान करता नाही आले. आता भावाच्या अथक प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये नाव आहे. यावेळी नक्कीच करेन. मला वाटते माणसापेक्षा संघटना जास्त महत्वाची. पण दोहोंचा अभ्यास करून मत देणे योग्य.
राजकारण्यां इतकेच आपण सुद्धा नालायक आहोत असे माझे वैयक्तिक मत आहे. ज्या लोकांनी मतदानाचा अधिकार असून सुद्धा मतदान केले नाही त्यांना सामाजिक गोष्टींवर नुसतेच मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही असे मला वाटते. मतदान करायचे नाही. का? तर माझ्या एकट्याच्या मताने काय होणारे आहे? हा विचार करून प्रत्येक जण घरी बसतो आणि मग हे लोक आपला कार्यभाग उरकतात. आपण त्यांना ऐती संधी देतो.
मला तुम्ही कुठे हि असला तरी पोष्टाने मतदान करता येते आणि ते अनेक वेळा महत्वाचे ठरते.
मी स्वतः शाळेत असताना ३ निवडणुका लढवल्या आहेत. त्यातल्या २ जिंकल्या आहेत. एकदा स्त्री शक्तीला विरोध केल्यामुळे हरलो आहे. त्यावेळीच एकीचे आणि मतदानाचे महत्त्व जास्त कळले. त्या नंतर सक्रिय राजकारणात उतरलो नाही शाळा सुटल्यावर. पण यशस्वी राजकीय व्यूहरचना केली आहे.
मुद्दा असा की प्रत्येकाने मतदान केले पाहिजे कारण प्रत्येकाला स्वतःचे असे काही मत असते आणि ते व्यक्त करणे तेवढेच गरजेचे आहे. आपणच आपला समाज घडवत असतो.
माझे स्वतःचे निरीक्षण असे आहे की आपण भारतीय फारच छोटा विचार करून मतदान करतो. म्हणजे पाहा, आज पेट्रोल महागले म्हणून सरकार विरुद्ध मतदान करायचे, कांदा महागला म्हणून सरकार विरुद्ध मतदान करायचे, फुकट कोणी काही द्यायची नुसती घोषणा केली तरीही त्याला मतदान करायचे. पण असे का झाले?हे असे होईल का? सरकार दीर्घ मुदतीचे परिणामकारक निर्णय घेऊ शकते का? त्यात मला काय होऊ शकते आणि देशाला काय होऊ शकते याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे.
लिहिण्या सारखे खूप आहे. पण टप्प्या टप्प्यात लिहिलेले बरे .....
चाणक्य