१. शब्दोच्चार टोर्टिया असा आहे. स्पॅनिशमध्ये दोन एल एकत्र आले असता त्याचा उच्चार "य" असा होतो हे आपण लक्षात ठेवावे. इतर स्पॅनिश उच्चाराबद्दल नंतर सवडीने लिहीन.
२. टोर्टियाचे तुकडे तळले असता ते फुगत नाहीत, म्हणूनच फक्त दही बटाटा पुरीसाठीच वापरतो, पाणीपुरीसाठी नाही.
३. टॉर्टिया चिप्स वेगळ्याप्रकारे बनवलेल्या आणि तळलेल्या असतात त्यामुळे त्या वापरायचा जवळचा मार्ग (शॉर्ट कट) यशस्वी होणार नाही असे वाटते. विकत मिळणार्या टोर्टियांचे तुकडे करून तळणे हेच सगळ्यात योग्य मार्ग आहे असे माझ्या पत्नीने अनुभवाने ठरवले आहे.
४. त्याच टोर्टिया निम्म्या कापून त्याची गुंडाळी करून त्यात सामोशाचे सारण भरून ते ओल्या पिठाने बंद करून ती सामोसे पण करते हे इथे नमूद करीत आहे. जर त्याची कृति हवी असेल तर मी देऊ शकेन.
कलोअ,
सुभाष