राहुल छान विषय. काही उत्तरे
जे महाराज हयात नाहीत), त्यांना आता देवत्व बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या देवळात दर्शनासाठी रांगा लागतात, लांबुन लांबुन लोकं त्यांच्या मुर्तीच्या दर्शनाला येतात. श्रीमंत देवळं म्हणून ती गणली जातात. (निरीच्छ व सर्वसंग परीत्याग केलेल्या महाराजांची देवळे मात्र श्रीमंत, हा एक आर्थीक 'चमत्कार' आहे).
हे मोठे सत्य आहे. वर म्हंटल्याप्रमाणे
जीवघेणी स्पर्धा व त्यातून अस्तित्वासाठीची लढाई व मर्यादीत स्त्रोत यातून ही भावना येते. ही निव्वळ भीती, मानसिक दौर्बाल्य, हतबलता आणि आलेल्या संकटांना सामना न करू शकणारे कमकुवत मन यांची भावना असते.
तर बरेचसे भक्तगण हे कुणा इतरांमुळे "प्रेरित" होऊन यात सामिल झालेले दिसतात.
मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करून घेणे हे कमीपणाचे वाटल्याने, आपल्यात (मानसिक) कमतरता असू शकते या बाबीकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणे आणि ही पळवाट शोधणे हे ही एक कारण असू शकेल.
सत्यसाईबाबांविषयी काही अमेरिकन तज्ज्ञ्यांची मते वाचण्याचा योग आला. त्यात म्हंटल्यानुसार तरूणपणी बाबांना असे चमत्कार दाखवण्यात स्वारस्य असे आणि ते लोकांना आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी तसे करून दाखवत. त्यामुळेच त्यांना एवढे भक्तगण मिळाले. पुढे ते चमत्कार थोडे मर्यादीत झाले आणि ते कुठले ते सर्वश्रुत आहे. (कृपया हे माझे मत नसून वाचनातून मिळालेले ज्ञान आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पाचारण नको.)
चांगले उच्च विद्याविभूषीत लोकं त्यांचे भक्त आहेत हो, ह्या सगळ्यांनी एखाद्याला गुरु करतांना विचार केला असेलच की! ह्या महाराजांच्या / स्वामींच्या समाजसेवेने प्रभावीत होऊन अनुयायी होत असतील का? (असं असल्यास चांगलीच गोष्ट आहे!)
शक्यता आहे आणी नाही, विद्येचा आणि विश्वासाचा काही एक संबंध नसतो. अनेक उच्च विद्याविभूषित स्त्रीयांना मी महालक्ष्मी व्रताचे पालन करताना पाहिले आहे.
समाजाच्या मानसीक आधाराची गरज हे महाराज/स्वामी भागवत आहेत का?
एखाद्याला शांती लाभत असेल पण कामधंदा सोडून तासनतास रांगेत उभं राहून "चला रे हाकला रे यांना" च्या धूनवर दर्शन घेणाऱ्या लोकांविषयी मला तसं वाटत नाही.