आपल्याकडे विचार आणि विश्लेषण करू शकणाऱ्या लोकांचे आणि त्यातूनही क्रियाशील लोकांचे प्रमाण व अशिक्षित व इतरांच्या म्हणण्याप्रमाणे मतदान करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेतले पाहिजे. नाही तर संख्याबळावर चालणारे राजकारण थोड्यांच्या प्रयत्नाने बदलेल हे अरण्यरुदनच ठरेल.

अभिजित , आपले म्हणणे पूर्णपणे पटले. यामुळेच आता घरी राहायला गेल्यावर नियमित मतदान करणार आहे. सगळे राजकारणी सारखेच असे म्हटले तरी सुजाण नागरिक मतदान करतात आणि त्यांच्या मतदानात सत्तेची समीकरणे बदलण्याची ताकद आहे हे एकदा लक्षात आले की राजकारणीही थोडे जबाबदार होतील असे वाटते.

माझ्या गांवचेच उदाहरण देते. रत्नागिरी तालुक्यातील माझे गांव हे सर्वात संपन्न गाव आहे( पु. ल. म्हणतात तसं 'गांव कोंकणातील असल्याने' संपन्न शब्द सापेक्ष आहे.) इथे ठराविक दोन माणसेच आळीपाळीने सरपंच होत आणि मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव असला तर त्यांच्या बायकांच्या नावावर तेच राजकारण करत. केवळ दोनच पर्याय उपलब्ध असल्याने निवडणार कुणाला हा प्रश्न भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या सगळ्यांचाच होता. अशा परिस्थितीत माझी वहिनी पुढे आली आणि केवळ जनसंपर्क एवढ्याच भांडवलावर निवडून येऊन सरपंच झाली. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याने पुढील खेपेसही गांवकऱ्यांनी तिला निवडून दिले. तात्पर्य to change the system you have to be a part of it.

मला राजकीय कारकीर्द नाही.  मनोगतावर अजूनही मी नवाच आहे

मस्त आहे. मी इथे पडीक (या शब्दास माझा आक्षेप नाही, गर्वसे कहो हम पडीक है इ.इ.) असल्याने इथे मला बऱ्यापैकी राजकीय कारकीर्द आहे म्हणण्यास हरकत नाही.

अनु, तू उल्लेखलेला अनुभव भयानक आहे. अशा शिक्षणसम्राटांचा एक माझ्या मित्राला आलेला अनुभव मी "साम्राज्य" या कथेत लिहिला आहे. पण तुला आलेल्या अनुभवावरून  हे सम्राट आपल्या विद्यार्थ्यांकडूनही किती भयानक , बेकायदेशीर कामे करून घेतात हे दिसून आले.

महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल आहे, थोड्याच दिवसांत आपण पूर्णतः पुण्यभूमी बिहारचे नाव पाठी टाकू.

                                          साती काळे.