एकदा दोन भुते भांडता भांडता एकमेकांना शिव्या देऊ लागली

"माणूस!" एकजण दुसऱ्याला म्हणाला. "तूच माणूस!" दुसऱ्याने पहिल्याला ठणकावले.

                   *********************

एकदा एका भुतांच्या कुटुंबांत भुताचे पिल्लू रडायचे थांबत नव्हते. तेव्हा वैतागलेली सौ. भूत त्यावर ओरडली, "आत गप्प बस, नाहीतर माणूस येईल बघ!" श्रीयुत भुतांना लहान पिल्लांना उगाच खोटी भीति दाखवणे पसंत नव्हते. ते समजावणीच्या स्वरांत म्हणाले, "घाबरू नको बाळ. माणूस बिणूस काही नसतं. सगळे मनाचे खेळ आहेत."