मी आजपर्यंत झालेल्या जवळजवळ प्रत्येक निवडणुकींत मतदान केले आहे. तसे करतांना मी अनेक वेळा पक्ष बदलले आहेत. 

यापुढे मी इतर लोकही मतदान करतात की नाही ते पहाणार आहे. मला वाटते प्रत्येक वस्तींतील जागरुक मतदारांनी (कुठल्याही पक्षाच्या बाजूने न बोलता) आपल्या वस्तीतून शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे असा निश्चय करून त्यासाठी प्रयत्न केले तर मतदानाच्या टक्केवारींत लक्षणीय वाढ होईल.