प्रयत्नपूर्वक शिवले होते
पुन्हा उसवले.
हृदय फाटले दुःख आतले
वाहू लागले.
कल्पना छानच आहे. पण आधी उसवले आणि पुन्हा नंतर फाटले? दुर्दैव म्हणावे की फाटले हा भरीचा शब्द म्हणावा?
जाणिवपूर्वक जपली होती
वीण आतली.
जाता जाता मागुन पण तू
हाक मारली.
वावा, छान.
स्थितप्रज्ञ होण्याचा कित्ती
प्रयत्न केला.
ओली हळवी किनार पाहुन
तोही फसला.
"ओली हळवी किनार" ठेवणीतले शब्दबंबाळ वाटते. बघा घालवून.
कविता छान आहे. फारच छान वा उत्तम होऊ शकते. बाकी तुमच्या काही कविता फारच छान असतात. पण इतर लग्गीलॉटवाल्या वाटतात. हे असे का, ह्याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे.
चित्तरंजन