मी अनेकदा मतदान केलं आहे.  आतापर्यंत दोन वेळा मतदान करण्याचे पक्ष बदलले आहेत.  जेव्हा मतदान केले तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांशी कोणत्या उमेदवाराचा विकासाचे कार्यक्रम राबवण्यात काय सहभाग होता, हे बोलून मग (गुप्त) मतदान केले आहे. 

माझ्या वडिलांनी मला मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यावर अनेकदा मतदान करायला प्रोत्साहन दिलं आहे.  जेव्हा कोणीच चांगलं नाही, म्हणून आम्ही मतदान  करत नाही असं म्हणण्याची पद्धत आली आणि मी त्याला बळी पडायला लागले तेव्हाही त्यांनी मला मतदान करायचे महत्त्व समजावून दिले.   कुणालाही मत दे, पण दे असा आग्रह त्यांनी धरला.  

मी मत देताना पहिले महत्त्व पक्षाची ध्येयधोरणे याला दिले आहे आणि त्यानंतर उमेदवाराच्या प्रत्यक्ष कामगिरीला.  कधीकधी उमेदवार फारच वाईट असला तर मात्र दुसऱ्या समांतर धोरणे असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला दिले आहे.

 

सुहासिनी