परभाषीय शब्दांच्या शुद्धलेखनाचा आणि शुद्ध उच्चाराचा आग्रह योग्य आहे पण उच्चाराविषयी बरेचदा निश्चितता नसते.
खरे आहे. म्हणूनच ब्रिटीश उच्चारांचा आधार घेतला आहे. एकाच शब्दाचे दोन उच्चारही प्रचलित असू शकतात. जसे कन्ट्रॉवसी आणि काँट्रवसी हे दोन उच्चार. प्रोजेक्ट बाबत
आत्ताच श्री. चित्त यानी दिलेल्या project या शब्दाचा उच्चार on line dictionary वर मुद्दाम ऐकला तो प्रॉजेख्ट असा आहे ,
आपण सांगितलेला उच्चार अमेरिकन आहे. भारतीय उच्चार अमेरिकन उच्चारांपेक्षा ब्रिटिश उच्चारांच्या जवळ आहेत. म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे, ऑक्सफर्ड मधील उच्चार प्रमाण मानले आहेत. आपण वेबस्टरचा आधार घेतला असावा.