परभाषीय शब्दांच्या शुद्धलेखनाचा आणि शुद्ध उच्चाराचा आग्रह योग्य आहे पण उच्चाराविषयी बरेचदा निश्चितता नसते आणि तो नसावा कारण प्रत्येकजण आपल्या आजू बाजूच्या समाजावरुन उच्चार निश्चित करत असतो.
उच्चारांवरून बरच शीतयुद्ध चाललेल असत (घरात)
आमची कन्यका हमखास काय पोएम असं म्हणतेस "पोअम" म्हणायच असतं अस सुनवत असते. अमेरिकेत तस ते म्हणतात.
"थँक यू" ला ही "थैंऽक यू" म्हणतात.
तर बरेच ब्रिटीश हॅपी सारख्या शब्दांचा "हॅपऽय" असा उच्चार करतात. अर्थात असा वापर अमेरिकेत करुन चालणार नाही.
आपल्याकडे राणिच्या देशातील मनोगती आहेत त्यांनी ब्रिटिश उच्चारांबाबत अधिक खुलासा करावा.