व्याकरण आणि भाषेच्या सोवळेपणाविषयी पूर्ण आदर राखूनही मी या प्रस्तावाशी असहमत आहे.
भारतात परदेशी भाषा वापरताना त्या भाषेचे भारतीय रूढ रूप वापरणे अधिक योग्य आहे असे मला वाटते. त्यामुळे 'शेवली' पेक्षा 'शेवरोलेट' म्हणणे चूक आहे असे मला वाटत नाही. किंबहुना परदेशी शब्द परदेशी उच्चारात म्हणणे हे कृत्रीम आहे असे माझे मत आहे. परदेशी भाषा त्या त्या देशांत वापरताना गोष्ट वेगळी.