नाही रावसाहेब. आपण मराठी मध्ये उच्चार करताना "अनुच्चारित अक्षर" (silent letters) ही संकल्पना पाळत नाही. पण इंग्रजी मध्ये ही संकल्पना नियमित पाळतात. आता, शेवरलेट च्या उदाहरणात 'ट' अनुच्चारित आहे. आणि र सुद्धा अर्धवट आहे. म्हणून त्याचा उच्चार शेवर्ले असा केला पाहिजे.
परदेशी शब्द परदेशी उच्चारात म्हणणे मला कृत्रिम वाटत नाही. माझे नावच घ्या ना. Mahesh Hatolkar चा उच्चार सर्व परदेशी लोक "माहेश हातोल्कर" असाच करतात. तेच रूढ रूप आहे. पण म्हणून ते बरोबर नाही आणि नैसर्गिकही नाही.