युरोपाच्या नजरेतून पाहता अनेक गोष्टींची मुळे ही मध्यपूर्वे आणि/किंवा अरबस्थानातल्या देशांमध्ये दिसून येतात. वास्को-द-गामा ने आफ्रिकेला वळसा घालून भारतात येण्याचा पर्यायी मार्ग शोधेपर्यंत (१४९८) कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) मार्गे चीन आणि भारतीय उपखंडाशी युरोपाचा व्यापार चालत असे. साहजिकच युरोप, चीन, भारतवर्ष आणि अरबस्थानातल्या एतद्देशीयांची संस्कृती या सर्व संस्कृतींचे मिश्रण होऊन एक सरस संस्कृती अस्तित्वात आली होती. त्यामुळे युरोपीयांना पूर्वेकडचे ज्ञान मिळवण्यासाठी अरबस्थानाच्या पूर्वेला जाण्याची गरज वाटली नसावी असे वाटते. (भारतात युरोपीय लोक मसाले, रेशीम इत्यादींच्या व्यापारासाठी आले, ज्ञानार्जनासाठी नाही असे वाटते.) युरोपीयांसाठी मध्यपूर्व हीच पूर्व दिशेची परमावधी असावी असे वाटते.

अन्यथा, उदा०

म्हणण्याचे इतर काही कारण असेल असे वाटत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येऊ शकतील असे वाटते. असो.

अधिक खोलात जाता असा प्रश्न पडतो की-
वारांच्या नावांवर भारतीय संस्कृतीचा परिणाम आहे की ह्याच्या अगदी उलटे आहे?