Hatolkar च्या ऐवजी Huttolkar (किंवा असेच काही) स्पेलिंग केले तरच त्याचा उच्चार हतोळकर च्या जवळपास जाईल. आपली स्पेलिंगे आपण मराठमोळी करून टाकली आहेत.
पुणे आपण Pune असं लिहितो - Puney किंवा Punay च्या ऐवजी - त्यामुळे ते एका अमेरिकनाने ट्यून च्या धरतीवर प्यून असे वाचले.
दुसऱ्या एका अमेरिकनाला आपल्या या भारतीय स्पेलिंगांची सवय आहे. पण तोही गंडतो. त्याने Punjab चा उच्चार स्पेलिंग-बरहुकुम पूंजाब असा केला.
एकंदरीत काय, मजाच मजा.
- कोंबडी